अभिनेते  Ramesh Pardeshi उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार?

Ramesh Pardeshi : आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत राहणारे अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. अभिनय सोडून  पिट्याभाई  राजकारणात का सक्रिय होतायेत? हा  प्रश्न तुम्हाला  ही पडला असलेच? तर  हे ‘नगरसेवक’ पद  त्यांनी आपल्या आगामी  ‘सिंगल’ या (Single) चित्रपटासाठी  स्वीकारलं आहे.  या चित्रपटात ‘नगरसेवक राजाभाऊ  सूर्यवंशी’  ही  भूमिका ते साकारणार आहेत. विशेष म्हणजे  ‘सिंगल’ चित्रपटात पुण्यातील  विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. २७ ऑक्टोबरला ‘सिंगल’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘सिंगल’च्या निमित्ताने मी प्रथमच पडद्यावर एका राजकारणी व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतोय. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. राजाभाऊ सूर्यवंशी या भूमिकेने मला ही वेगळी संधी दिली असून माझी ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असा विश्वास पिट्याभाई व्यक्त करतात.

दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी ‘सिंगल’ चित्रपटाचे दिगदर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे  यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया