Shreyas Iyerने मारला विश्वचषकातील सर्वात लांब षटकार, जखमी होण्यापासून थोडक्यात बचावली रोहितची पत्नी

Shreyas Iyer World Cup’s Largest Six: श्रेयस अय्यरने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (ICC World Cup 2023) आतापर्यंत काही खास प्रदर्शन दाखवू शकल्याची कमी श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka vs India) भरुन काढली आहे. अय्यरने वानखेडे मैदानावर धुव्वादार खेळी केली आहे. अय्यरने आपल्या घरच्या मैदानावर शानदार फलंदाजी करत विश्वचषकातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले आहे. श्रेयसने या खेळीदरम्यान स्पर्धेतील सर्वात लांब षटकारही मारला आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेह (Ritika Sajdeh) अय्यरच्या षटकाराने जखमी होण्यातून थोडक्यात बचावली.

अय्यरने सर्वात लांब षटकार मारला
शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर क्रीजवर आलेला श्रेयस अय्यर सुरुवातीपासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. अय्यरने उघडपणे फटके मारले आणि झंझावाती पद्धतीने डावाला सुरुवात केली. अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 36 चेंडू घेतले. भारतीय फलंदाजाने केएल राहुलसोबत अर्धशतकी भागीदारीही केली.

अय्यरने डावाच्या 41 षटकांत महेश तिक्षानाविरुद्ध स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारला. श्रेयसने समोरच्या बाजूने 106 मीटर लांब षटकार मारला. स्टँडवर बसलेल्या रोहित शर्माची पत्नी रितिकाला अय्यरच्या षटकाराने धक्का बसला आणि ती जखमी होण्यातून थोडक्यात बचावली.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे