Aditi Rao Hydari | अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचे गुपचूप लग्न! दोघानीही सहन केले आहे घटस्फोटाचे दुःख

Aditi Rao Hydari Siddharth Wedding | आदिती राव हैदरी आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर सिद्धार्थ यांच्याबद्दल नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या जोडप्याने आपल्या नात्याचे रुपांतर कुणालाही न कळू देता लग्नात केले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने अखेर लग्न केले आहे. आजच या जोडप्याने सात फेरे घेतल्याची बातमी समोर आली आहे. हैदराबाद, तेलंगणातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी नावाच्या मंदिरात दोघांचा विवाह झाला. दोघांच्या जवळचे लोकच या लग्नात सहभागी झाले होते.

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि सिद्धार्थचे गुपचूप लग्न!
चाहते अजूनही या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण लग्नानंतर अजून तरी ना कोणता फोटो जारी केला आहे ना या बातमीला दुजोरा दिला आहे. अशा स्थितीत आत्ताच काही निश्चितपणे सांगता येणार नाही. जर आपण त्यांच्या प्रेमकथेबद्दल बोललो तर 2021 सालापासून त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांनी बातम्यांचा बाजार तापवला आहे. अदिती आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच तामिळ-तेलुगू चित्रपट ‘महा समुद्रम’च्या सेटवर भेटले होते. त्यांची प्रेमकहाणी इथून सुरू झाली.

अनेक वर्षांपासून डेटिंग सुरू आहे
दोघेही अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर चाहत्यांना खात्री झाली की त्यांच्यात काहीतरी सुरू आहे. मात्र, या जोडप्याने जगासमोर त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही. या दोघांमधील जवळीक स्पष्टपणे दिसत होती. सोशल मीडियावरही दोघेही एकमेकांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. एका डान्सिंग व्हिडीओने या दोघांचा पर्दाफाश केला होता. जेव्हा हे दोघे एकत्र नाचताना दिसले तेव्हा त्यांची जोडी चाहत्यांनाही भावली.

दोघांचा यापूर्वी घटस्फोट झाला आहे
हे आदितीचे आणि सिद्धार्थचे पहिले लग्न नाही. सिद्धार्थने 2003 मध्ये मेघनासोबत पहिले लग्न केले होते, मात्र 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आदितीबद्दल बोलायचे झाले तर ती इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच सत्यदीप मिश्राची पत्नी बनली होती. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि 2013 मध्ये दोघे वेगळे झाले. आता अदिती आणि सिद्धार्थने एकमेकांशी लग्न करून नवीन संसार थाटला आहे. सध्या त्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार