Ambadas Danve | मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही तर…., अंबादास दानवे यांचं खळबळजनक वक्तव्य

Ambadas Danve | काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीवरुन शिवसेना ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यातील मतभेद उघड झाले होते. छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चा होत्या, ज्यावरुन अंबादास दानवेंनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान करू असे अंबादास दानवेंनी म्हटले होते. दरम्यान आता ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगर येथून खैरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दानवे म्हणाले की, सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. पक्षप्रमुख जी काही जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार