नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी घेतली प्रतीक पवार यांची भेट

अहमदनगर : कर्जत शहरात प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. पवार याने काही दिवसांपूर्वी भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

उदयपूर आणि अमरावतीतल (Udaipur and Amravati) हत्येच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये हत्येचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून फिर्याद नोंदवून घेत तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर (MLA Nitesh Rane, MLA Gopichand Padalkar) यांनी घेतली पीडित प्रतीक पवार (Pratik Pawar) यांची भेट यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची देखील भेट घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच कर्जत शहरातील कर्जत तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलीस अधिक्षकांसोबत चर्चा केली यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.