IPL 2024 पूर्वी सीएसकेला मोठा धक्का बसला, धाकड सलामीवीर फलंदाजाच्या अंगठ्याला दुखापत

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज आणि न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेवॉन कॉनवे (Devon Conway) बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान यष्टिरक्षक-फलंदाज डेवॉन कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. ऑकलंडमधील ईडन पार्क येथे विकेटकीपिंग करताना कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. सामन्याच्या दुसऱ्या षटकात 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या ॲडम मिलनेच्या चेंडूमुळे कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जबर दुखापत झाली.

कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली
त्यानंतर कॉनवे मैदान सोडण्यास भाग पडला आणि फिन ऍलनने उर्वरित डावासाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी घेतली. न्यूझीलंड क्रिकेटने कॉनवेवर ट्विटरवर एक अपडेट शेअर केला आहे, ज्यामध्ये कॉनवे दुसऱ्या टी20 सामन्यात यष्टीरक्षण करताना दुखापत झाल्यानंतर त्याच्या डाव्या अंगठ्याच्या एक्स-रेसाठी ईडन पार्क स्टेडियम सोडले आहे. पण कॉनवेच्या एक्स-रेमध्ये डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले, न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियावर याबाबत पुष्टी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

IPL 2024 पूर्वी सीएसकेला मोठा धक्का बसला आहे
तिसऱ्या टी-20साठी त्याच्या उपलब्धतेबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. कॉनवेने वेलिंग्टनमध्येही प्रभावी कामगिरी केली आणि 46 चेंडूत 63 धावांची झटपट खेळी केली. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 आधी या कॉनवेची दुखापत चेन्नई सुपर किंग्जसाठी धक्का आहे. कारण कॉनवे सीएसकेचा पसंतीचा सलामीवीर आहे.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?