‘हमारी भाभी कैसी हो…’ शुबमन गिल मैदानावर उतरताच साराच्या नावाचा झाला गजर, Video Viral

India vs England Sara Tendulkar Chants Ranchi Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील रांची कसोटी सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत आली आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) फलंदाजीसाठी मैदानात आला. गिल येताच चाहत्यांनी सारा तेंडुलकरच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चाहत्यांनी साराबद्दल कोणते नारे लगावले? पाहूया..

गिल येताच चाहत्यांचा मूड बदलला.
रांची कसोटी (India vs England) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॅट चालू शकली नाही आणि तो केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्मानंतर भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात आला. गेल्या सामन्यातही गिलने शानदार खेळी केली होती. राजकोट कसोटीत 91 धावा करून हा खेळाडू बाद झाला. या डावात आज गिल बॅटिंगला आला तेव्हा चाहत्यांनी सारा तेंडुलकरच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. ‘आमची वहिनी कशी असावी, सारा भाभीसारखी असावी’ अशा घोषणा सामना पाहणारे क्रिकेटप्रेमी देत होते. दरम्यान या सामन्यत शुबमन गिल 65 चेंडूत 38 धावा करुन बाद झाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?