Ahmednagar LokSabha 2024 | ‘श्रीमंत बापाची पोरं गरिबाला हिनवण्यातच..’, लंकेंना इंग्रजी बोलण्याचं आव्हान देणाऱ्या सुजय विखेंना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar LokSabha 2024) भाजपाचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) निलेश लंके अशी लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही नेते लोकसभेसाठी (Ahmednagar LokSabha 2024) मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. यादरम्यान विखे पाटील यांनी निलेश लंके यांना एक आव्हान दिले आहे. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पाठ करून जरी बोलली तरी मी अर्ज भरणार नाही असं जाहीर आव्हान सुजय विखे पाटलांनी दिले आहे.

यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. अरे सुजय… आपला बाप मंत्री होता, कारखानदार होता, आपण कॉन्व्हेन्ट मध्ये शिकलात. निलेश लंके यांचे वडील गरीब शेतकरी, लंके स्वतः चहा विकून उदरनिर्वाह करायचे (खराखुरा चहा मोदी सारखा काल्पनिक नाही), असे प्रशांत जगताप म्हणाले. तसेच तुझ्यासारखी श्रीमंत बापाची पोरं गरिबाला हिनवण्यातच समाधान मानतात, विखे मनाने अगदीच भिकारी निघाल्याचा टोलाही यावेळी प्रशांत जगताप यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती