Vasant More | आंबेडकरांच्या वंचितने पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Vasant More | प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे येथे महायुती (मुरलीधर मोहोळ), महाविकास आघाडी (रविंद्र धंगेकर) आणि वंचित अशी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. वंचितकडून उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांनी संधीचे सोने करुन दाखवेन, असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांना एकदाच भेटायला गेलो आणि लगेचच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेमध्ये असताना मला जी संधी मिळाली, त्याचे सोने करून दाखवले. या संधीचेही सोने करून दाखवेन. आता मला पुणे शहरावर काम करण्याची संधी मिळेल, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

तसेच ज्या पक्षात २५ वर्षे मी एकनिष्ठ राहिलो, तिथे मला न्याय मिळाला नाही. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी मला न्याय दिला. पुण्यातील विकासाचा जो पॅटर्न असेल, तो कात्रज विकासाचा पॅटर्न असेल. माझा वैयक्तिक कोणताच पॅटर्न नसेल. कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन. कारण त्यांच्यामुळे ही संधी मिळाली, असे वसंत मोरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती