Sujay Vikhe Patil | निलेश लंकेंनी माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलून दाखवलं तर उमेदवारी मागे घेईन, सुजय विखेंचे आव्हान

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) निलेश लंके अशी लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही नेते लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. यादरम्यान विखे पाटील यांनी निलेश लंके यांना एक आव्हान दिले आहे. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पाठ करून जरी बोलली तरी मी अर्ज भरणार नाही असं जाहीर आव्हान सुजय विखे पाटलांनी दिले आहे.

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी ( Sujay Vikhe Patil) संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंना इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखेंनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती