‘मध्यरात्री बोलवल्यावर मी हिरोंच्या खोलीत जात नाही, म्हणून…’ कंगना राणौतच्या वक्तव्याचा रोख कोणाकडे

अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या कामापेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा कुणाला तरी टार्गेट करताना दिसते. पुन्हा एकदा पंगा गर्लने बॉलिवूडच्या माफियांवर तोंडसुख घेतले आहे. कंगनाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून दोन-तीन ट्विट केले आहेत. या ट्वीटद्वारे कंगनाने बॉलीवूडच्या माफियांवर निशाणा साधला की, ती रात्री फोन आल्यानंतर नायकांच्या खोलीत जाणाऱ्यांतील नाही, म्हणूनच ते तिला गर्विष्ठ म्हणतात. याशिवाय कंगनाने आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊया…

कंगना रणौतने ट्विट करून लिहिले की, ‘भिकारी फिल्म माफियाने माझ्या वृत्तीला माझा गर्व म्हटले, कारण मला इतर मुलींप्रमाणे त्यांच्यासमोर दात कसे दाखवायचे, आयटम नंबर करायचे आणि लग्नात डान्स कसा करायचा हे माहित नाही. रात्री फोन केला असता हिरोच्या खोलीत जाण्यास मी स्पष्टपणे नकार दिला आहे. म्हणून त्यांनी मला वेडी ठरवून तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न केला आहे.

ही वृत्ती आहे की प्रामाणिकपणा? स्वत:मध्ये सुधारणा करण्याऐवजी ते माझ्यात सुधारणा करायला निघाले आहेत. पण, मला स्वतःसाठी काहीही नको आहे. मी नुकतेच सर्व काही गहाण ठेवून एक चित्रपट बनवला आहे, असे तिने पुढे लिहिले आहे.