दिल्लीसह महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता ढासळली; ‘या’ वाहनांवर घालण्यात आलेली बंदी सुरूच राहणार

Delhi Air Polution – दिल्लीतल्या हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर, 13 ते 20 नोव्हेंबदरम्यान इथं सम-विषम वाहनव्यवस्था राबवण्यात येणार असल्याची माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी काल दिली. दिल्लीत लागू करण्यात आलेल्या श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या चौथ्या टप्प्यांतर्गत बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिजेल वाहनांवर घालण्यात आलेली बंदी सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एलएनजी, सीएनजी आणि अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणारे, तसंच अत्यावश्यक सेवांसाठी काम करणारे इलेक्ट्रिक ट्रक वगळता इतर वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता पातळी अद्याप गंभीर आहे आणि राजधानीवर धुक्याचा दाट थर कायम आहे. काल दुपारी बारा वाजता दिल्लीतला वायू गुणवत्ता निर्देशांक 435 इतका नोंदवला गेल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे.

महाराष्ट्रातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे 200 च्या पुढे गेला आहे. या प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. खोकला आणि श्वसनविकारांमध्ये वाढ झाली आहे. त्याची दखल घेऊन राज्याच्या आरोग्य विभागानं सर्व आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना उपाययोजना सुचवल्या आहेत. तसंच नागरिकांनी घराबाहेर पडताना एन-95 किंवा एन-99 मुखावरण वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यातल्या एकंदर 17 शहरांमध्ये वायूप्रदूषणामुळे होणाऱ्या तीव्र आजारांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’