आमचा नेता किडनॅप झालाय आम्हाला त्याला पाहायचंय, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

nawab malik

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. पहाटे पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर नवाब मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात गेले आहेत.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयासमोर जमा झाले आहेत. नवाब मलिक तुम आगे बढो हम तुम्हारे साथे है अशा घोषणांनी ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाच्या बाहेरच अडवल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी आमचा नेता किडनॅप झालाय आम्हाला त्याला पाहायचय अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘आज सकाळी नवाब भाईंना कोणतीही नोटीस न देता घरातून घेऊन गेले, तुम्ही सांगत आहेत ते ईडीच्या कार्यालयात आहेत तर आम्हाला त्यांना भेटण्याची परवानगी द्या आमचा सरळ आरोप आहे आमच्या नेत्याला किडनॅप करण्यात आलय. असा आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

Previous Post
ram satpute

‘राष्ट्रवादी कांग्रेसने नाकाने वांगे न सोलता मलिक यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल बोलावं’

Next Post
modi-fadanvis-thackeray

मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाला मोदी-फडणवीस यांना सन्मानाने बोलवा; भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Related Posts
जेजुरी खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू

जेजुरी खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू

जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात ( Jejuri Khandoba Temple) आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान…
Read More

मंत्री नवाब मलिकांचे समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का?

कागल – मंत्री नवाब मलिकांचे समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का? असा सवाल राजे समरजितसिंह घाटगे यांनी…
Read More
Pakistan Cricket Board | टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान बोर्ड नाराज, बाबरच्या संघातून 'हे' खेळाडू होऊ शकतात बाहेर

Pakistan Cricket Board | टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान बोर्ड नाराज, बाबरच्या संघातून ‘हे’ खेळाडू होऊ शकतात बाहेर

Pakistan Cricket Board | टी20 विश्वचषकाच्या खेळपट्टीवर आणखी एक सामना आणि त्यात टीम इंडियाचा आणखी एक विजय. म्हणजे…
Read More