संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत ‘एवढ्याच’ उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

Loksabha Election : महाराष्ट्रात आतापर्यंत 10 जणांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागपूरमध्ये 5, रामटेकमध्ये 1, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात आतापर्यंत 23 कोटी रुपयांची रोख रक्कम, 17 लाख लीटर मद्य, 700 किलो अंमलीपदार्थ, 46 किलो सोनं चांदी आणि मोफत वाटायच्या 1 लाखांहून अधिक वस्तू जप्त केल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. यात मुद्देमालाची तपासणी सुरू असून कायदेशीर असलेला मुद्देमाल संबंधितांना परत केला जाईल, असं ते म्हणाले. राज्यातल्या 13 हजार 141 व्यक्तींवर भारतीय दंड संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. परवाना नसलेली 308 शस्रं जप्त करण्यात आली असून परवाना असलेली 45 हजार 755 शत्र ताब्यात घेणं, जप्त करणं किंवा आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यात परवाना दिलेली 77 हजार 148 शस्र असून उर्वरित शस्रांची पडताळणी सुरू असल्याचं ते म्हणाले.
राज्यात 98 हजार मतदान केंद्र उभारली जाणार असून निवडणूक जाहीर झाल्यापासून 1 लाख 84 हजार 841 मतदारांची राज्यात नोंद झाल्याची माहिती एस. चोकलिंगम यांनी दिली आहे. लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 10 दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येत असून अधिकाधिक व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावं, मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करावी आणि मतदान करावं असं आवाहनदेखील त्यांनी केलं. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी एकंदर पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार