मी गंभीरशी भांडलो नसतो तर माझा बँक बॅलन्स वाढला असता; केकेआरच्या माजी क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा

Manoj Tiwari On Gautam Gambhir : बंगालचा अनुभवी क्रिकेटपटू मनोज तिवारीने (Manoj Tiwari) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. नुकताच त्याने शेवटचा रणजी सामना खेळला. त्याच्या शेवटच्या सामन्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशननेही त्याचा गौरव केला. मात्र मनोज तिवारी निवृत्तीनंतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याने अनेक मुलाखती दिल्या असून यादरम्यान अनेक खुलासेही केले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या या माजी क्रिकेटपटूने गौतम गंभीरबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

मनोज तिवारी (Manoj Tiwari) 2010 ते 2013 दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा अविभाज्य सदस्य होता. 2012 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने ड्वेन ब्राव्होच्या चेंडूवर विजयी चौकार मारले होते. त्यानंतर कोलकाताने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते. मात्र तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरसोबत ड्रेसिंग रूममध्ये मोठ्या भांडणानंतर फ्रँचायझीमधील आपला प्रवास कसा संपुष्टात आला? याबद्दल मनोज तिवारीने धक्कादायक खुलासा केला आहे.

2013 मध्ये गौतम गंभीरसोबत भांडण झाले होते
एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये त्याचे गंभीरसोबत मोठी भांडण झाले होते. ही बातमी कधीच समोर आली नाही. त्याने पुढे कबूल केले की जर ही घटना घडली नसती तर तो केकेआरसाठी आणखी काही हंगाम खेळला असता. यामुळे त्याच्या खिशात आणखी पैसे आले असते आणि त्याचा बँक बँलेन्सही वाढला असता. मात्र, त्याची त्याला खंत नाही.

तिवारी म्हणाला की, “केकेआर 2012 मध्ये चॅम्पियन बनला. त्यावेळी मी विजयी चौकार मारण्यात यशस्वी झालो होतो. या प्रदर्शनानंतर मला आणखी एक वर्ष केकेआरकडून खेळण्याची संधी मिळाली असती. 2013 मध्ये जर मी गंभीरशी भांडलो नसतो तर कदाचित मी आणखी दोन-तीन वर्षे खेळलो असतो. म्हणजे करारानुसार मला मिळणारी रक्कम वाढली असती. बँक बॅलन्स अधिक मजबूत झाला असता, पण मी याचा कधी पश्चाताप केला नाही.”

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल