“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

Maratha Reservation : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकडे (Special Session) सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. या अधिवेशनात राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षणात १० टक्के आणि नोकरीत १० टक्के आरक्षण लागू केले आहे. या विधेयकाला सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने संमती दिल्याने हे विधेयक मंजूर झाले. मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात विधेयक मंजूर झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्माणात व्हायरल होत आहे.

भरतशेठ गोगावले हे फोनवर म्हणत आहेत की, “१०-१० हजाराच्या दोन फटाक्याच्या माळा लावल्या पाहिजे. फटाक्यांच्या आवाजाने उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत. या माळांमध्ये सुतळी बॉम्ब लावा. सर्वांना फोन करुन सर्व मराठ्यांना बोलावून घ्या. खरे मराठे असेल तर तिथे जमा व्हा, असं त्यांना आवाहन करा. जो मराठा नसेल तो येणार नाही, असं सांगा. सर्व कार्यकर्त्यांना बोलावून जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे. आपले सर्व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक सर्व तिथं हजर पाहिजेत. पेढे वाटा. तुमच्या आनंदोत्सवाचे फोटो इकडे यायला पाहिजे. साहेबांना दाखवायचं आहे, महाड विधानसभा मतदारसंघात कसा जल्लोश झाला आहे.”

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा