Pune News | विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी मेळावा

Pune News : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ३५ वा स्नेहमेळावा (Alumni Gathering) रविवार, दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजिला आहे. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने रविवारी (दि. २५) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत शिवाजी हौसिंग सोसायटी येथील समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन वसतिगृहात हा मेळावा होत असून, यंदा मेळाव्याचे प्रायोजकत्व मराठवाडा विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी मंडळाच्या कार्यवाह मनीषा गोसावी यांनी दिली.

ज्येष्ठ माजी विद्यार्थी सुधीर मोकाशे हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी, तर वनाधिकारी नंदकिशोर गोतमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्ता, देणगीदार व कर्मचारी यांचा सन्मान, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान, कार्यपरिचय यासह गप्पा-गोष्टी, विचार विनिमय व जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो.

ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या (Pune News ) गरीब व हुशार विद्यार्थ्यांची अल्पदरात भोजन व निवासाची सोय व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने गेली ६९ वर्षे विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ही संस्था काम करते. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा संस्थेत योगदान द्यावे, संस्थेशी संलग्नित राहून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, या निमित्ताने असे मेळावे उपयुक्त ठरतात. अधिकाधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल