इमानदार आंदोलक नको म्हणून सरकारने हा ट्रॅप रचला, Manoj Jarange यांनी फेटाळले अजय बारसकरांचे आरोप

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सोबती अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्या वक्तव्यामुळे मराठा संघटनेत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange Patil) अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र मनोज जरागेंनी सर्व आरोप फेटाळले असून इमानदार आंदोलक नको म्हणून सरकारने हा ट्रॅप रचला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा हा आहे. मराठा समाजाचं वाटोळं करू नका. तुकाराम महाराजांबद्दल बोललो असल्यास माफी मागतो, हवं तर तोंडावर मारून घेतो, पण बारसकरांची माफी मागणार नाही. मला पाणी पाजून त्याला मोठं व्हायचं होतं, असा टोलाही मनोज जरागेंनी यावेळी लगावला.

एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा डाव आहे. सरकारचा ट्रॅप सुरु झाला असून सरकारने ट्रॅप बंद करावेत. अजून 16 ते 17 ट्रॅप असून सरकार यांना मायाजाळ्यात अडकवत आहे, आमिष दाखवून भुलवत असल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होतं, ते मिळाले नसेल. मुख्यमंत्र्यांच्या पीएसोबत आला होता. आतापर्यंत त्यांना मी 6 महिने गोड होतो. त्यांना ट्रॅप करायचा होता, त्यात शिंदे साहेबांचा आणि त्याचा एक माणूस होता. शिंदे साहेबांचा प्रवक्ता देखील आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होता, असा खुलासाही यावेळी मनोज जरांगेंनी केला.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल