भुजबळांसह अजितदादांनाही जीवे मारण्याची धमकी, आरोपीने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती

Pune – राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे झुंजार नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी देणाऱ्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे.

आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार फक्त छगन भुजबळच नाही तर आणखी काही बड्या नेते रडारवर होते. अजित पवार ,धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या. दरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीनं नाव प्रशांत पाटील असून, तो कोल्हापूरच्या जरंदगडचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचंही प्राथमिक तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.