मोदींनी आयुष्यात कधीच श्रीरामाच्या तत्त्वांचं पालन केलेलं नाही; भाजप नेत्याची टीका

Ram Mandir Ayodhya : अयोध्येत आज होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा (Ram Temple Pranpratishta) सोहळ्यानिमित्त देशभरात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. घरोघरी श्रीरामाचे चित्र असलेले आकाशकंदिल; भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. चौकाचौकांतही भगव्या पताकांच्या माळा, श्रीरामांचं भव्य आकर्षक चित्र, विद्युत रोषणाई असं उत्सवी वातावरण कालपासूनच दिसत आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा आज सोमवारी पार पडत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय टीका देखील होताना पाहायला मिळत आहे.भाजपचे जेष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहेत पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही. विशेषत: त्यांच्या पत्नीविषयीची त्यांची वागणूक पाहाता हे दिसत आहे. शिवाय गेल्या १० वर्षांत पंतप्रधान म्हणून ते रामराज्याप्रमाणे वागलेले नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे.शिवाजी मानकर

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी