Ajit Pawar | शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा

Ajit Pawar |  शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशातल्या व राज्यातील जनतेला दिला.

नव्या दमाने, नव्या जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विधानसभेला सामोरा जाणार असून एकदिलाने मोठी भरारी घेताना राष्ट्रवादीची पताका फडकवण्याचा संकल्प अजित पवार यांनी व्यक्त केला. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचे विचार हीच राष्ट्रवादीची विचारधारा होती आणि यापुढेही राहिल असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

बळीराजासोबत जोडलेला… शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख आहे. युवक, महिला, मागासवर्गीय, मुस्लिम, आदिवासी,भटके विमुक्त अशा सर्व समाजघटकांना पक्षाने जोडून ठेवले आहे. शिवाय या घटकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप