अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

Ajit Pawar : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याकडूनअजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. भाजपाचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा या तक्रारीत म्हटले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहे. त्यानंतरही या प्लॉटची मोजणी केली जात होती. हा प्लॉटचा रवींद्र साळगावकर यांच्याकडे आहे. यामुळे त्यांना सतत धमकी येत आहे, असे साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवार यांच्यांकडून अद्याप काही स्पष्टीकरण दिले गेले नाही. पोलिसांनी रवींद्र साळगावकर यांचा जबाब घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजून कुठलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय पोलिस घेणार आहेत.