महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली – केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे (Union Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde) यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना महाविकास आघाडीवर (MVA) टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास थांबला होता तो आता फडणवीस आणि शिंदे जोडी पुन्हा सुरु करेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

यावेळेस बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मराठा (Maratha) असल्याचही आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती. अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करतील, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.