अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करणारी त्याची गर्लफ्रेंड मेहा नेमकी आहे तरी कोण ?

Axar Patel Marriage : केएल राहुलसह (KL Rahul), संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने (Axar Patel) देखील या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत एकदिवसीय आणि टी20 मालिकेतून बीसीसीआयकडून (BCCI) सुट्टी घेतली आहे. या काळात ज्याप्रमाणे केएल राहुल लग्न करणार आहे, त्याचप्रमाणे अक्षर पटेलही त्याची गर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत (Meha Patel) या काळात लग्न करणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 (T20) आणि एकदिवसीय (ODIs) मालिकेसाठी संघाची घोषणा करताना बीसीसीआयकडून सांगण्यात आले की कौटुंबिक बांधिलकीमुळे केएल राहुल आणि अक्षर पटेल निवडीसाठी उपलब्ध नाहीत.

अक्षर पटेल आणि मेहा पटेल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी 20 जानेवारी 2022 रोजी दोघांची एंगेजमेंट (engagement) झाली होती. आता दोघेही लग्नासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र अक्षर पटलेने लग्नामुळेच बीसीसीआयच्या रजेसाठी अर्ज केल्याचे मानले जात आहे. टीम इंडिया जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध होम सीरिज खेळेल तेव्हा अक्षर पटले गर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, मेहा पटेल डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट (Dietician and Nutritionist) आहे. मेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. ती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय तिने अक्षर पटलेसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे गर्लफ्रेंड मेहा पटेल हिच्याही हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू आहे. अक्षर पटेलने मेहाला तिच्या 28 व्या वाढदिवसादरम्यान प्रपोज केले होते.