गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूंना परवानगी द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी

Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे.(Allow only Hindus to play Garba, demands Vishwa Hindu Parishad)

गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्याआणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.

गरबा उत्सवात अनेक धर्मीय तरुण-तरुणी येत असतात. यामुळे हिंदू महिलांची आणि तरुणींची छेड काढली जाते. यामुळे लव्ह जिहादसारख्या घटना घडतात. अशा घटना घडू नयेत याकरता काळजी घेतलेली बरी, म्हणून विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केली.

यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे (Vishwa Hindu Parishad Vidarbha Province Chief Govind Shende) यांनी दिली आहे.