उस्मानाबाद येथील सरिता व बावर्ची लॉजवर टाकलेल्या छाप्यात पाच महिला सापडल्या

तुळजापूर  – उस्मानाबाद येथील अनैतिक देह व्यापार (Unethical prostitution) करणाऱ्या दोन लॉजवर पोलिसांनी छापे .मारुन पाच महिलांना हॉटेल व्यवस्थापकास ताब्यात घेतले, या प्रकरणी दोन लॉज व्यवस्थापकासह मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई शुक्रवार दि १६ रोजी राञी आठ वाजण्याचा सुमारास केली.

उस्मानाबाद पोलिस पथक दि . १६. रोजी गस्ती दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या  माहिती आधारे , उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यालगत ‘ हॉटेल सरिता ‘ व उस्मानाबाद येथील बार्शी रोड , हनुमान चौकातील ‘ बावर्ची हॉटेल अॅन्ड लॉजिंग या दोन हॉटेलमध्ये हॉटेल चालक व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे समजताच तिथे दोन बनावट ग्राहकांस पाठवून खात्री करुन प्रथमतः हॉटेल सरिता येथे १ ९ .४५ वा . सु . छापा टाकला असता हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये ४ प्रौढ महिला आढळून आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली. हॉटेल चालक एक ४९ वर्षीय महिला असुन ती त्या ४ महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देऊन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करून त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले . यावर पथकाने त्या हॉटेल चालक महिलेस अटक करून तीच्या ताब्यातील एक मोबाईल फोन व ४,५०० ₹ रोख रक्कम असा माल हस्तगत केला .

दुसऱ्या छापा हा बावर्ची हॉटेल अॅन्ड लॉजिंग येथे टाकला असता हॉटेलमधील एका खोलीत एक प्रौढ महिला आढळून आल्याने महिला पोलीसांमार्फत तीची विचारपुस केली असता हॉटेल व्यवस्थापक नेपाळ राज्यातील एक पुरुष असून तो त्या महिलेला लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन तीच्यावर आपली उपजिवीका करीत असल्याचे समजले. यावर पथकाने त्या हॉटेल व्यवस्थापकास अटक करून त्याच्या ताब्यातील एक मोबाईल फोन व ३.००० ₹ रोख रक्कम हस्तगत केली.

. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन्ही हॉटेलावरील एकुण ५ महिलांची सुटका करुन दोन्ही हॉटेलच्या व्यवस्थापकासह दोन्ही हॉटेल मालकांविरुध्द भा.दं.सं. कलम ३७० , ३७० अ ( २ ) सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४,५ अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र . २८७ , २८८ / २०२२ हे दोन गुन्हे नोंदवले आहेत . सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक एम . रमेश , पो.नि. के.एस. पटेल , उस्मान शेख ,चाटे , सपोफी कन्हाळे , महिला पो.कॉ. पुरी , सांगळे , राऊत, शेख , जाधव, अभुरे , खांडेकर , साळुंके , जमादार , पाडे यांच्या पथकाने केली.