बोंबला : अयोध्येतील योगी मंदिरातून योगींची मूर्ती गायब, मंदिर बांधणारा भक्तही बेपत्ता!

अयोध्या – अयोध्येतील नुकत्याच पूर्ण झालेल्या योगी मंदिरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मूर्ती गायब झाली आहे. मंदिर बांधणारे प्रभाकर मौर्यही बेपत्ता आहेत. मंदिराच्या जागेचा वाद असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही लोक एका कारमध्ये आले आणि त्यांनी मंदिरातील मूर्ती पळवून नेली. अयोध्येतील रामजन्मभूमीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या भरतकुंड परिसरात फैजाबाद-प्रयागराज महामार्गावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी एक मंदिर बांधण्यात आले आहे, जिथे त्यांची नियमित पूजा केली जात होती.

हे मंदिर फैजाबाद-प्रयागराज महामार्गावर रामजन्मभूमीपासून 25 किमी अंतरावर जिल्ह्यातील भरतकुंड भागात बांधण्यात आले आहे. भरतकुंड हे ठिकाण ते आहे जेथे भगवान रामाचा भाऊ भरत याने वनवासाला जात असताना त्यांना निरोप दिला होता. या मंदिरात धनुष्यबाणांनी सुसज्ज योगी आदित्यनाथ यांची मूर्ती बसण्यात आली होती. ही मूर्ती भगव्या रंगात रंगवण्यात आली होती.