Amol Kolhe | शरद पवार गटाकडून शिरूरमधून कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी घोषित,आढळराव पाटलांशी दोन हात करणार

Amol Kolhe Shirur | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच उमेदवरांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर येथे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (shivaji adhalrao patil) अशी लढत होऊ शकते. राष्ट्रवदी काँग्रेस अजित पवार गटाकडून आढळराव पाटलांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरीही त्यांना उमेदवारी मिळणे निश्चित आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) शरद पवारांचे आभार मानले. अमोल कोल्हे म्हणाले की,’शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचा मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो. कारण 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्षाच्या सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो. मला वाटतं की हा पुन्हा पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलाय हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.

महविकास आघाडीचे सगळेच तगडे उमेदवार आपल्याला रिंगणात दिसतील आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स या लोकसभा निवडणुकीत आपण मी कायम अस म्हणतो की wait and watch असा परफॉर्मन्स पाहायला मिळेल, असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल