राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

NCP Sharad Pawar Loksabha Candidate : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच उमेदवरांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा, दिंडोरी, बारामती, शिरूर आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये पहिली यादी जाहीर केली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या वतीने अशा पाच उमेदवारांची आम्ही पहिली यादी जाहीर केली आहेत. उर्वरित उमेदवारांची यादी पुढील काही दिवसांत जाहीर केली जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंधपणे लढलं पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल