सेल्फीचा मोह जिवावर बेतला! काका पुतण्याच्या बुडून मृत्यू

खेड – खेड तालुक्यातील कोंडिवली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले असताना सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात आठ वर्षाच्या मुलगा,तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय त्याचा चुलता या दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुदैवाने अजून दोन लहान मुले दैव बलवत्तर म्हणून पाण्याबाहेर राहिल्याने बचावली आहेत.

रविवारी संध्याकाळी खेड तालुक्यातील निळीक वरचीवाडी येथील इम्रान याकूब चौगुले आणि सुहाना फैजान चौगुले  व मुलगी लाईबा व मुलगा याकूब  हे चौघेजण कोंडिवली डॅमवर फिरण्यासाठी गेले होते. या  डॅमवर सेल्फी घेण्यासाठी मुलगा पाण्यात उतरला व याचवेळी दुर्देवाने त्याचा पाय घसरला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच इम्रान याकूब चौगुले हे वाचवण्यासाठी गेले मात्र दुर्देवाने दोघेजण बुडाले.

नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ खेड पोलिसांना या दुर्घटनेची माहिती दिली. खेड पोलिसांनी तात्काळ कोंडिवली धरणावर धाव घेत धरणात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यास सुरवात केली. अखेर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धरणातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह रात्री उशिरा मिळाले आहेत.  पोलीस तपासात हा प्रकार सेल्फी काढताना घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.या प्रकरणी अधीक तपास खेडचे प्रभारि पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करत आहेत.