हिंदुत्वाच्या विचारांवर कोण चालत आहे याची भाजपा आणि सेक्युलर पार्ट्यांमध्ये स्पर्धा – ओवैसी

नांदेड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सोबतच भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संपूर्ण भारतात मुस्लिमांन विरोधात एक द्वेषाचे वातावरण भाजपाने तयार केले आहे.स्वतःला सेक्युलर पार्ट्या म्हणून घेणाऱ्यांमध्ये आणि भाजपा मध्ये स्पर्धा लागली आहे.की सर्वात जास्त हिंदुत्वाच्या विचारांवर कोण चालत आहे. संविधानाच्या विरोधात बोलल्या जात आहे. हे त्याचेच परिणाम आहेत की यांच्यात एक प्रकारे स्पर्धा लागली आहे.याचे परिणाम मात्र भारतातील मुस्लिमांना भोगावे लागत आहेत.

देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांची घरे तोडली आणि जाळली जात आहेत.एक प्रकारे भाजपा तर्फे मुस्लिमांना सजा देण्याचा हा सर्व प्रकार असल्याचे खासदार असदोद्दीन ओवैसी म्हणाले.भाजपा स्वतःला न्यायाधीश समजत आहे.तर या देशात न्यायालयाची गरजच आता राहिली नाही.