अनिल अंबानीनी करण जोहरला दिले एक गुप्त पत्र ,असे काय लिहिले होते त्या पत्रात ज्यामुळे त्याचं नशीब पालटले 

भावना संचेती – करण जोहर (Karan Johar) हा एक उत्तम निर्माता , दिग्दर्शक तर आहेच. पण तो एक चांगला माणूस देखील आहे . करण अनेक सिनेकलाकारांचा खूप  चांगला मित्र आहे. त्याच्या घरी नेहमी पार्ट्या होत असतात या पार्ट्यांमध्ये अनेक मोठे कलाकार हजेरी लावत असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का करणचे अंबानी परिवारा (Ambani’s) सोबत देखील तितकेच चांगले संबंध आहेत. करण – अनिल अंबानी यांना तर चक्क आपला भाऊच मानतो. करणचे एक आत्मचरित्र देखील नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

‘सुटेबल बॉय’ (Suitable Boy) हे त्याच्या आत्मचरित्राचे नाव आहे. यामध्ये करणने त्याच्या अनेक आठवणी , किस्से आणि त्याच्या जवळच्या माणसाबद्दल अगदी भरभरून लिहिलं आहे. तुम्हाला माहीत नसेल करण जोहर यांचे वडील यश जोहर (Yash Johar) हे एक मोठे निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी 1976 मध्ये धर्मा प्रॉडक्शन हाऊसची (Dharma Production House) स्थापना केली. धर्मा प्रॉडक्शनने अनेक उत्तम सिनेमानची निर्मिती केली आहे. अग्निपथ, कुछ -कुछ होता है यासारख्या असंख्य चित्रपटांची निर्मिती केली. 2004 रोजी यश जोहर यांचे निधन झाले.

यश जोहर यांचा मुलगा करण जोहर यांच्यावर धर्मा प्रॉडक्शनची सर्व जबाबदारी आली. अमितभ बच्चन (Amitabh Bachchan) पासून ते अगदी नवख्या सर्व कलाकारांपर्यत  सर्व करणचे मित्र आहेत. जेव्हा यश यांचे निधन झाले तेव्हा सर्वांनी करणला खूप सपोर्ट केला. अनिल यांनी यश गेल्यानंतर  चार दिवसांनी  करणला फोन केला आणि सांगितले मी तुला भेटायला येत आहे. तुझ्या वडिलांनी माझ्याकडे तुला देण्यासाठी असे काही दिले आहे जे फार महत्वपूर्ण आहे. काही वेळात अनिल करणच्या घरी पोहचले, त्यांनी करणला एक पत्र दिले .

यामध्ये यश जोहर यांनी सर्व गोष्टी लिहिल्या होत्या. जसे की कोणाकडून किती पैसे येणे बाकी आहे. तसेच कोणाला किती पैसे द्यायचे आहेत. त्याची संपत्ति कोठे कोठे आहे. तसेच अनेक बिजनेस विषयीची महत्वपूर्ण माहिती देखील त्यांनी लिहिली होती. ही सर्व माहिती वाचून करण यांना खूप फायदा झाला. करण यांनी अनिल यांचे आभार मानले. करणला  स्वताला देखील हे माहीत नव्हते की यश  यांनी अशा प्रकारचे पत्र लिहिले आहे. अनिल अंबानी म्हणतात मला यशजी यांनी काही दिवसांपूर्वी हे पत्र दिले होते आणि त्यांनी मला संगितले होते , जेव्हा मी या जगातून जाईल तेव्हा हे पत्र तुम्ही करणला द्या. अशा प्रकारे अनिल यांनी आपली मैत्री निभावली.