Ajit Pawar गटाला ट्विटरचा मोठा दणका, Sharad Pawar गटाने तक्रार केली होती

NCP Crisis: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट निर्माण झाल्यानंतर पक्षाच्या दाव्यावरून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) खाते सस्पेंड करण्यात आले आहे. याच नावावर खाते असल्याची तक्रार शरद पवार गटाने केली होती, त्यानंतर ते खाते निलंबित करण्यात आल्याचे अजित गटाचे म्हणणे आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाविरोधातील कायदेशीर लढा अधिक तीव्र केला आहे. पवार गटाने निवडणूक आयोगाकडे 500 पानी उत्तर दाखल केले आहे. ज्यात अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील 39 आमदारांना अपात्र घोषित करण्यात यावे, असे म्हटले आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांनुसार, पवार गटाला केवळ 11 आमदारांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाला 41 आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवार गटानेही राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाकडून उत्तरही मागवले होते.

https://youtube.com/shorts/Ju1y8hb1NHI?si=0qtW1pIMZiZwogoI

महत्वाच्या बातम्या-
कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा; धनंजय मुंडेंचे निर्देश
फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ, चित्रा वाघ यांचा इशारा