Animal फेम तृप्ती डिमरीचं विराट कोहलीविषयीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “तो मला खूप…”

Tripti Dimri Favourite Cricketer: बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या नवीन चित्रपट ‘एनिमल’च्या (Animal The Movie) यशामुळे चर्चेत आहे. एकीकडे तृप्ती डिमरीच्या अभिनयाने आणि लूकने संपूर्ण देश प्रभावित झाला आहे. त्याच वेळी, 29 वर्षीय अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत खुलासा केला की ती भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) खूप मोठी फॅन आहे.

विराट कोहलीचे चाहते जगभरातून आहेत. नुकतेच त्यात आणखी एका नावाची भर पडली. अॅनिमल या चित्रपटात झोयाची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने विराट कोहली तिच्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचा खुलासा केला आहे. ETimes ला दिलेल्या मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही.

पत्नी अनुष्कासोबत लंडनमध्ये सुट्टी साजरी करत आहे विराट
विराट कोहली सध्या विश्वचषक 2023 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेकवर आहे. त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून काही काळ ब्रेक घेतला असून पत्नी अनुष्कासोबत तो लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विराट कोहलीची कसोटी संघात निवड झाली आहे. कसोटी क्रिकेटमधून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki