Cricket News : क्रिकेट जगतावर पसरली शोककळा! कार अपघातात दिग्गज खेळाडूचा मृत्यू

Former West Indies Cricketer Dies In Car Accident: क्रिकेट जगतातील एका दिग्गजाने या जगाचा निरोप घेतला. या ज्येष्ठाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. या अनुभवी खेळाडूने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्धच खेळला होता. यानंतर ते निवड समितीचे अध्यक्षही राहिले.

या ज्येष्ठाचा कार अपघातात मृत्यू झाला
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेले अनुभवी ऑफस्पिनर क्लाइड बट्स (Clyde Butts) यांचे निधन झाले आहे. गयानाचा माजी कर्णधार आणि वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर बट्स हे शुक्रवारी कार अपघातात मरण पावले. वेस्ट इंडिज क्रिकेटने ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, गयानाचे माजी कर्णधार आणि वेस्ट इंडिजचे ऑफस्पिनर क्लाइड बट्स यांचे आज संध्याकाळी निधन झाले. आम्ही त्यांचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

क्लाइड बट्सची कारकीर्द
क्लाईड बट्सने 1980 च्या वेस्ट इंडिज संघात स्थान मिळवले आणि प्रभावित केले होते. बट्सने 1985 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि 1988 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. क्लाइड बट्सने वेस्ट इंडिजसाठी एकूण 7 कसोटी सामने खेळले आणि 10 विकेट घेतल्या होत्या. या काळात त्यांनी 108 धावाही केल्या होत्या. त्याच वेळी, त्याने 87 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 348 विकेट्स घेतल्या आणि क्लाईड बट्सने 32 लिस्ट ए सामन्यांमध्ये 32 बळी घेतले होते.

या दिग्गज क्रिकेटपटूचेही निधन झाले
वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज जो सोलोमन यांचेही निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जो सॉलोमनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 7 वर्षे टिकली. या कालावधीत, त्याने वेस्ट इंडिजसाठी 27 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1326 धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki