Harshvardhan Patil: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राज्यातील वातावरण तापत आहे. आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आपल्याला इंदापुरात फिरु न देण्याची धमकी आल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा इशारा दिला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
महाराष्ट्र राज्यमहाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर… pic.twitter.com/GkPWDRPo42
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) March 4, 2024
यावर वडिलांना धमकी दिली तर ठाकरे शैलीत उत्तर देणार, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी दिला आहे. प्रत्येकाने संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावं, असं आवाहन अंकीता पाटील यांनी केलं आहे. “माझ्या वडिलांबाबत असं एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुकाध्य आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं. ही आपली संस्कृती नाहीय. मला त्यांना एकच सांगायचं आहे, पातळी सांभाळून बोला. आम्हीपण आमची पातळी सांभाळून बोलत आहोत”, असं अंकिता पाटील म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले
Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प
भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal