2 आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे आदेश 

नवी दिल्ली- OBC आरक्षणप्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दणका दिला असून दोन आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. हा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका आहे.

दोन आठवड्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिल्याने आता 18 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांचं बिगुल ओबीसी आरक्षणाशिवाय वाजणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पुढील दोन आठवड्यातच जवळपास १८ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.