वार्षिक राशी भविष्य : आजची रास ‘ वृषभ ‘

वर्ष समिश्र स्वरूपाचे ...

वृषभ जातकांना कर्म व लाभाची सुभाता प्राप्त होईल, आनंदी राहणे हा वृषभ जातकाचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव सोडू नका,ही रास श्रमिक लोकांची रास आहे,ही पृथ्वी तत्वाची रास आहे,कष्टकरी स्वभाव या राशीच्या असतो पण हे लोक थोडे निष्काळजी पण असतात
या वर्षी राहू आपल्या मोक्ष स्थानातून व केतू षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे,तसेच गुरू महाराज आपल्या दशम सथनातून लाभ स्थानात प्रवेश करतील तसेच शनी कर्म स्थानातून भ्रमण करेल

वृषभ जातकास संपूर्ण मार्च ,जून उत्तरार्ध ,ऑक्टोबर उत्तरार्ध व नोव्हेंबर पूर्वार्ध शुभ जाईल, या काळात आपण महत्वपूर्ण कामाचे नियोजन करा, वर्षाचे सुरवातीस तुमची वाटचाल चुकीची होऊ शकते पण नंतर तुमचे व्यतिमत्व समृद्ध होईल, एप्रिल नंतर तुम्हाला शुभ काळ आहे . कौटुंबिक दृष्टीने विचार करता नवं वर्ष्या ची सुरवात कौटुंबिक सौख्याने होईल,कुटुंबातील लोकांचे प्रेम प्राप्त होईल

मार्च महिन्या पासून तुमच्या परिश्रमाची दिशा राहील,यश मिळेल वस्तू व वाहन या बाबत हे वर्ष शुभ आहे,याचे शुभ योग् वर्षभर राहतील,नवीन वस्तू वाहन खरेदी कराल, विद्यार्थ्यांना हे वर्ष शुभ आहे पण परिश्रम करावे लागतील,एप्रिल नंतर यश मिळेल .

आरोग्य व्हीतशत्रू यांचा विचार करता वर्ष्या च्या सुरवातीला हितशत्रूचा त्रास होईल पण ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही, स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल , आरोग्य सुध्धा एप्रिल नंतर सुधारेल, कोर्ट कचेरी मात्र या वर्षी त्रासदायक ठरेल,साह्य करताना काळजी घ्या,फसवणूक होण्याची श्यक्यता आहे, नौकरी व व्यवसाय बाबत यश प्राप्त होईल त्या साठी योग्य दिश्या मिळेल,मार्च पासून प्रगती होईल भाग्याची साथ मिळेल,जितके कर्म कराल तितकी भाग्याची साथ मिळेल काही अचानक मोठे खर्च उदभवतील. वर्ष समिश्र स्वरूपाचे आहे . – ज्योतिषगुरू : डॉ . राजेंद्र धर्माधिकारी ,  अहमदनगर