या एका शेअरमध्ये ज्यांनी गुंतविले, ते काही तासात मालामाल झाले..

अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या शेअरने जवळपास वर्षभराच्या स्थिर हालचालीनंतर मोठी झेप घेतली. एका दिवसांत हा शेअर 199 रुपयांवरुन 236 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.आज या स्टॉकमध्ये सुमारे 20 टक्के म्हणजेच सुमारे 40 रुपयांची वाढ झाली.जर एखाद्या गुंतवणूकदाराने आज सकाळी स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतविले तर त्याला काही तासात 18000 रुपये नफा झाला असेल.

अरिहंत कॅपिटल मार्केटच्या शेअरनी 49 महिन्यांचा कप आणि हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट केला.शेअर आज तब्बल 236 जाऊन पोहचला.जो 52 आठवड्यात उच्चांक आहे. स्टॉकने 130-135 चा बेस तयार केला आहे. हा शेअर आणखी वरती जाणार आहे असे जाणकार सांगतात. यंदाच्या नवीन वर्षात अनेकांना शेअर बाजरांकडून अनेक अपेक्षा आहेत. शेयर बाजारात तो थांबतो, मार्केट पाहतो, त्यांचा अभ्यास करतो तोच नफा कमावू शकतो. शेअर बाजरांचे गणित वरवर पाहिले तर फार सोप्पे वाटते पण जेव्हा त्यांचा सविस्तर अभ्यास केला जातो  तेव्हा त्यातील खाच- खळगे समजतात.