Price Money: वनडे विश्वचषकातील विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी, उपविजेता संघही होणार मालामाल

ODI World Cup Price Money: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतात होणार्‍या आगामी एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये 13व्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे, जिथे जगातील 10 सर्वोत्तम क्रिकेट संघ आपले नशीब आजमावताना दिसतील. क्रिकेटची सर्वोच्च संस्था म्हणजेच ICC या प्रतिष्ठित स्पर्धेत (World Cup Price Money) एकूण 10 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम वितरित करेल. भारतीय रुपयात हे अंदाजे 83 कोटी रुपये असतील.

चॅम्पियन संघाला बक्षीस म्हणून अंदाजे 33.17 कोटी रुपये दिले जातील, तर उपविजेत्या संघालाही रक्कम दिली जाईल. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत होणारा संघ, म्हणजे उपविजेता संघ, अंदाजे 16.59 कोटी रुपयांसह मायदेशी जाईल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना 6.63 कोटी रुपयांची समान बक्षीस रक्कम दिली जाईल. याशिवाय ग्रुप स्टेजवरील सामना जिंकण्यासाठी संघांना 33.17 लाख रुपये मिळतील.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून विद्यमान चॅम्पियन इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. भारतीय संघाला घरच्या मैदानावर आयसीसी स्पर्धेचा दुष्काळ संपवण्याची ही सुवर्णसंधी आहे. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’