वार्षिक राशी भविष्य : आजची राशी ‘ मेष ‘

मेष :- मेष राशीच्या जातकांना नवीन वर्ष्यात भरपूर लाभाची प्राप्ती होईल,त्यांची सर्वांगीण प्रगती होईल,मेष राशीचे लोक धर्यवान व धाडसी असतात,विचार न करता बेधडक कृती करण्याची त्यांची सवय असते,मेष ही रास राशी चक्रातील पहिली रास असून ही अग्नी तत्वाची रास आहे,त्यामुळे मेष राशीचे लोक तापट स्वभावाचे असतात.

या वर्षी एप्रिल महिन्यात राहू आपल्या राशीत प्रवेश करत असून,केतू सप्तमातून भ्रमण करणार आहे,गुरु कुंभेतून मिनेत म्हणजे आपल्या व्यय स्थानातून प्रवेश करेल,शनी स्वतःच्या मूलत्रिकोण राशीतून,कुंभेतून म्हणजे आपल्या लाभ स्थानातून भ्रमण करेल

जानेवारी 22,तसेच मार्च,ऑक्टोबर, व डिसेंबर महिन्यांचा उत्तरार्ध मेष राशीस अत्यंत शुभ जाणार आहे. व्यक्तिमत्व समृद्ध होईल, यशासाठी लढण्यासाठी तयार व्हाल ,यश मिळेल , भाग्य साथ देईल इच्छा पूर्ण होतील,कौटुंबिक सौख्य लाभेल .

सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये जरा काळजी घ्या,नैराश्य येईल, मनावर ताबा ठेवा, एप्रिल मध्ये तुमच्या राशीचा कर्मेश बुध व्यय स्थानात जात आहे. तेथे त्याची नीच रास आहे,त्यामुळे तुमच्या कर्माची दिशा चुकण्याची शक्यता आहे सावध राहा . वास्तू, वाहन व सुख शांती याचे दृष्टीने मेष जातकांना हे वर्ष लाभाचे जाईल, फ्लॅट,घर ,वाहन ,जमीन याचिखरेदी होईल, विफ्यार्थ्यांना एप्रिल पर्यंतचा काळ अत्यंत शुभ आहे,इच्छा पुरती होईल,शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी प्राप्त होईल.

आरोग्य उत्तम राहील,मतच-एप्रिल मध्ये हितशत्रूचा त्रास होईल, कोर्ट कचेरीत यश मिळेल पण महत्वाची कागदपत्रे सांभाळा नौकरी व व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत लाभदायक आहे,मागे झालेले नुकसान भरून निघेल,वर्ष भाग्योदयाचे आहे.एकंदरीत हे वर्ष मेष जातकांना लाभ दायक जाणार आहे.