‘गोरी, सडपातळ बायको पाहिजे’; ४० वर्षीय पठ्ठ्याने लग्नासाठी थेट तहसीलदाराला मुलीची केली मागणी

उन्हाळा म्हणजे लग्नाचा हंगाम असतो. उन्हाळ्यातील अधिकतर मे महिन्यात सर्वाधिक लग्न होतात. मात्र राजस्थान, पंजाब, बिहार या राज्यामध्ये लग्नाला मुली मिळण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे तेथील तरूण काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. अशातच आता एका ४० वर्षाच्या पठ्ठ्याने थेट तहसीलदाराला पत्र लिहून लग्नासाठी मुलीची मागणी केली आहे.

महावर असं पत्र लिहिलेल्या तरूणाचं नाव असून त्याने दौसा जिल्ह्यातील बहरावंडा तालुक्यातील तहसीलदाराला पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने आपल्याला कशी बायको हवी आहे याविषयी लिहिलं आहे. त्याचबरोबर त्याने अटी आणि नियमसुद्धा या पत्रामध्ये लिहिल्या आहेत. या पठ्ठ्याची ही करामत नेटकऱ्यांच्या नजरेपासून लपून राहिलेली नाही. महावरचे हे पत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलंय?

माझी घरची परिस्थिती प्रतिकूल असून मी लग्न होत नसल्यामुळे तणावाखाली आहे. मी घरचे काम करण्यास असमर्थ असल्यामुळे मला आता घरातील काम करण्यासाठी बायकोची आवश्यकता आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की मला बायको मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. अटी खालीलप्रमाणे

१) सडपातळ असली पाहिजे

२) गोरी असली पाहिजे

३) ३० ते ४० या वयोगटातील असली पाहिजे

४) सगळे कामं यायला पाहिजेत