कौतुकास्पद :  आर. माधवनचा मुलगा वेदांत बनला देशातील सर्वात वेगवान जलतरणपटू

मुंबई – बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत माधवन (Vedant Madhavan) कनिष्ठ श्रेणीत देशातील सर्वात वेगवान जलतरणपटू (Swimmer)बनला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 16:01.73 सेकंदात ही कामगिरी करताना वेदांतने 2017 मध्ये त्याचाच सहकारी अद्वैत पागेचा विक्रम मोडला. अद्वैतने १६:०६.४३ सेकंदांचा विक्रम केला. आर माधवनने आपल्या मुलाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.
आपल्या मुलाच्या या कामगिरीने आर माधवन खूप खूश आहे. यावेळी त्यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्विट करून लिहिले आहे की, 1500 मीटर फ्रीस्टाइलमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला गेला आहे.

सुपरस्टार आर माधवनचा हा व्हिडिओ ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटवर त्याचे अनेक चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. वेदांत माधवन हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला जलतरणात भारताचे नाव जगभर रोशन करायचे आहे. अशा परिस्थितीत नवा राष्ट्रीय विक्रम हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. आर. माधवन आपल्या मुलाच्या यशाने खूप खूश आहे.