Earthquake | नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळीच भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड शहरासह हदगाव, नायगाव , अर्धापूर तालुक्यात काही ठिकाणी धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांपासून ते 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवले.

हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake) जाणवले. हिंगोली तालुक्यासह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यात काही ठिकाणी सकाळी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी पहिला धक्का, तर सहा वाजून 19 मिनिटापर्यंत दुसरा धक्का जाणवला. यावेळी सिरळी गावात काही घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. 4.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही.

दुसरीकडे, नांदेड येथे अनेक भागात गुरुवारी सकाळी 6 वाजून 8 ते 6 वाजून 9 मिनिटाच्या दरम्यान दहा सेकंद 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 15 किलोमीटरवर दाखवला जात आहे. प्रशासनाची याबाबतची माहिती दिली आहे.

परभणी जिल्ह्यातही सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 4.2 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये जिल्ह्यात कोणत्याही नुकसानीची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली नाहीये. सदर भूकंपाचं केंद्रबिंदू हे हिंगोली जिल्ह्यात असल्याने 60 किलोमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली