Eknath Shinde | चौफेर विकास कसा करायचा याची नस त्याला कळलीय, मुख्यमंत्री शिंदेंनी गायवे लेकाचे गुणगान

Eknath Shinde | डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) याच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज डोंबिवलीत काढले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील आदी महायुतीच्या प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉ. शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

आज मी आपल्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून या ट्रिपल रोलमध्ये उभे आहोत. खासदार डॉ  श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल समाधानी असून त्याची विकासाची गाडी राईट ट्रॅकवरच नाही तर फुल स्पीडमध्ये आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही तर संसदरत्न असून त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर कल्याण लोकसभेच्या मतदारसंघांनी त्याला खासदार म्हणून त्याला स्वीकारलेलं असून बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा आशीर्वाद तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची घेतलेल्या मेहनतीमुळे डोंगराएवढी ही कामे करणे शक्य झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर चौफेर विकास कसा करायचा याची नस त्याला कळलेली असून आपण त्याला 2014 मध्ये निवडून दिलेत, 2019 मध्ये निवडून दिले आणि 2024 मध्येही पुन्हा निवडून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, मनसेचे आमदार राजू पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे, रिपाई आठवले गटाचे प्रल्हाद जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, स्टार प्रचारक राहुल लोंढे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री, महिला आघाडी जिल्हाप्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन