बीडमध्ये भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडली

बीड – भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी (BJP Beed City President Bhagirath Biyani) यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात (Phoenix Hospital) नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (BJP city president Bhagirath Biyani commits suicide in Beed)

दरम्यान, भगीरथ बियाणी हे बीड शहरातील एमआयडीसी परिसरात (In MIDC area) राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणींनी आज ( ११ ऑक्टोंबर ) सकाळच्या सुमारास गोळी झाडत आत्महत्या केली. आता भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, यामागे काही राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का, याची चौकशी आता पोलीस करत आहेत. (The police are now investigating whether there is any political or family reason behind Bhagirath Biyani’s suicide.) पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.