संजय पांडे यांना ज्या प्रकरणात अटक झाली ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

मुंबई – नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील (National Stock Exchange) एका गैरव्यवहार प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) अटक केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशी संबंधित एका फर्मने एनएसईच्या 91 पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याचं यापूर्वी ईडीला आढळून आलं होतं.

मार्च 2001 मध्ये संजय पांडे यांच्याशी संबंधित आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं NSE च्या त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण (Chitra Ramakrishna and Ravi Narayan) यांच्या कथित निर्देशांनुसार NSEचं सुरक्षा ऑडिट केलं होतं,त्या कालावधीत, हा को- लोकेशन घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

अवैध फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण या तिघांविरुद्ध दोन प्रकरणं नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी एक प्रकरण ईडीनं तर दुसरं केंद्रीय अन्वेषण विभागानं नोंदवलं आहे. संजय पांडे यांना ईडीनं नोंद केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक झाली आहे.