स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी नव्या संसदेचे उद्घाटन होणार असल्याने विरोधकांचा तिळपापड होतोय ? 

Mumbai – २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत.मात्र हे उद्घाटन आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.  पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करावे असे काँग्रेसचे म्हणणे आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक शिष्टाचारासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक असेल, असंही काँग्रेसनं सांगितलं आहे.

हा वाद एवढा वाढला होता कि  काहींनी या संबंधित जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर स्वतःहून सुनावणी करण्यास नकार दिला. या घडामोडींवर आता भाजप प्रवक्ते प्रवीण अलई यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले, हे नवीन संसद भवन, नवीन भारताचे प्रतीक आहे:या इमारतीच्या शिलान्यासावर मोदींचे नांव काहीना काही प्रकारे येणारच. ते कोणी थांबवू शकत नाही. हे नवीन संसद भवन, नवीन भारताचे प्रतीक आहे: हे मोदी देशाला व जगाला सांगणारच. पण देशात असे अनेक लोक आहेत, त्यांना नवीन भारत ही संकल्पनाच सहन होत नाही. त्यांना भारत हा एक गुलाम देश म्हणूनच राहीलेला हवाय, भारतातले हिंदू हे मुगलांचे अथवा युरोपीयन लोकांचे मिंधेच राहीले पाहिजेत अस वाटतंय. मिंधा भारत हाच खरा भारत. युरोपियन लोकांच्या, अमेरीकन लोकांच्या, इस्लामीक देशांच्या, चीनी लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवणारा हिंदू आणि हिंदुस्थान ? ही कल्पनाच  या लोकांना सहन होत नाही.

निमुटपणे अत्याचार सहन करणारा तो खरा हिंदु व तोच खरा भारत, हीच त्यांची मनीषा… !_मोदींना अपेक्षित असलेला स्वाभिमानी हिंदु व हिंदुस्थान त्यांना मग्रूर वाटतो, आक्रमक वाटतो. वे कबुतर हवा मे छोडते थे,  मोदी जंगलमे चित्ताह छोडते है। यह कैसा भारत है ? बरं, ते सगळ ठीक आहे.मोदींनी या नवीन संसद भवनाचे उदघाटन करण्यासाठी दिवस कोणता निवडावा ? स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जन्मदिवस ? खरा तिळपापड होतो आहे तो इथेच…..! म्हणून तर, मराठी अस्मितावाले पेटून उठले आहेत. जीवाच्या आकांताने या कार्यक्रमावरुन मोदींवर टीका करीत आहेत. या कार्यक्रमाला गालबोट लावीत आहेत.असो. जनता मात्र हा भव्य दिव्य कार्यक्रम, याची देही याची डोळा बघणारच .वीर सावरकरांचा हा अनोखा सत्कार बघणारच….नवीन संसद भवनाच्या उदघाटनावरुन एवढा तिळपापड होतो आहे, तर मग रामलल्लाच्या मंदिराच्या उदघाटनाच्या वेळी काय गहजब होईल ? वीर सावरकरांच्या जन्म दिवशी नवीन संसदभवनाच्या इमारतीचे उदघाटन होत आहे हा खरंच मराठी लोकांसाठी, तुमच्या आमच्यासाठी व प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी अभिमानाचा दिवस आहे. असं प्रवीण अलई यांनी म्हटले आहे.