Viral Video | खेळणी समजून मुलाने तोंडात घातला खरा साप! Video पाहून उडेल थरकाप

Viral Video : मुलं अनेकदा त्यांच्या तोंडात काय घालतील याचा अंदाज घेणे कठीण असते. जर त्यांना हे खाऊ नकोस हे घाण आहे असे सांगितले तरीही ते काहीही चघळायला सुरुवात करतात. नुकताच असाच एका मुलाचा भितीदायक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक लहान मूल खेळताना सापाला खेळणी समजत तोंडात घालतो. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून लोक घाबरले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये  तुम्ही पाहू शकता की, एक लहान मूल सापाला तोंडाजवळ घेऊन जात आहे, यादरम्यान साप वेदनेने त्रासलेला दिसत आहे. काही वेळाने मुलाने साप तोंडात टाकला. मग तो साप बाहेर काढतो आणि फिरवायला लागतो. इतकंच नाही तर मुल कधी सापाला खांद्यावर तर कधी पायावर ठेवते. नीट पाहिल्यास लक्षात येते की हा साप साधारण साप नसून लहान कोब्रा आहे. कदाचित हा साप विषारी नसावा, किंवा त्याचे विष काढलेले असावे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर लड्दुलाल चौधरी (जाजरा_सरकार) नावाच्या युजरने शेअर केला असून कॅप्शन लिहिले आहे- खरा व्हिडिओ, तेजाजी महाराज मुलांसोबत एन्जॉय करताना आणि लहान मूलही तेजाजी महाराजांचा आनंद घेत आहे. या व्हिडिओला 58 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी 3 लाख लोकांनी लाइक केले आहे. लोक या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. काही लोक पालकांना नेहमी लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देत आहेत, अन्यथा ते धोकादायक ठरू शकते. हा साप खरा दिसत नसून ते फक्त रबराचे खेळणे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यावर काही लोक प्रतिक्रिया देत आहेत की, साप ज्या पद्धतीने फिरत आहे, तो खेळण्यासारखा दिसत नाही.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा