सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुनचा महिला क्रिकेटरसोबतचा फोटो होतोय व्हायरल, कोण आहे ती?

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्सने (Jemmimah Rodrigues) अर्जुन तेंडुलकरसोबतचा (Arjun Tendulkar) एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जेमिमाह आणि अर्जुनसोबत प्रशिक्षक प्रशांत शेट्टीही दिसत आहेत. जेमिमाह आणि अर्जुनचा हा फोटो फलंदाजीच्या सराव सत्रानंतरचा आहे. यासोबत जेमिमाहने एक हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिले आहे.

भारताची ही महिला क्रिकेटर आणि अर्जुन तेंडुलकर अंडर-12 पासून एकमेकांना ओळखतात. जेमिमाहने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ’12 वर्षांखालील दिवसांपासून आतापर्यंत… आम्ही खूप पुढे आलो आहोत.’

जेमिमाह आणि अर्जुन लहानपणापासून एकत्र क्रिकेटचा सराव करत आहेत. जेमिमाने राष्ट्रीय संघात पदार्पण केले असले तरी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अजूनही भारतीय संघात पदार्पणाची वाट पाहत आहे. मात्र, त्याच वर्षी अर्जुनला इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.